सोलापूरहुन तुळजापूर उस्मानाबाद धावणार रेल्वे

प्रशांत कांबळे
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुळजापूरच्या भाविकांना आंनदाची बातमी दिली आहे. यामध्ये सोलापूरहुन तुळजापूर मार्ग उस्मानाबाद, या नव्या ब्रॉडगेज लाईनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार (ता.9) रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मध्य रेल्वे प्रशासनाला अचानक ई-मेल आल्याने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

मराठवाडय़ातून रेल्वेचे जाळे पसरण्याच्या हेतूने व पर्यायाने तेथील विकासाला चालना मिळावा यासाठी सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग आणि सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद असा नवा रेल्वेमार्गाचा प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली होती. यापैकी सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद मार्गावरील एका मार्गावरील हा प्रकल्प 2005 मधील असून, 68 किलोमीटर अंतराचा आहे. या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

या ब्रॉडगेज रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवेला आता खुद्द पंतप्रधानाकडून हिरवी झंडी मिळाली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर - उस्मानाबाद नव्या ब्रॉडगेजचे भूमिपूजन करणार असल्याने या मार्गांवरील तुळजापूर जाणाऱ्या भाविकांना मात्र अत्यंत महत्वाची सुविधा होणार आहे.

Web Title: Train will run on Tuljapur Osmanabad from Solapur