Mumbai Local Train | मुंबई लोकलचा खोळंबा; पहाटेपासून वाहतूक विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local News
मुंबई लोकलचा खोळंबा; पहाटेपासून वाहतूक विस्कळीत

मुंबई लोकलचा खोळंबा; पहाटेपासून वाहतूक विस्कळीत

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचा आज पहाटेपासून खोळंबा झाला आहे. तांत्रिक कारणामुळे झालेल्या बिघाडामुळे मुंबई लोकल काही वेळ उशिरा येणार आहे.

ओव्हरहेड वायर तुटल्याने हा बिघाड झाला आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. दहीसर-बोरिवली स्टेशनच्या दरम्यान हा बिघाड झाला आहे. यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दहिसर, बोरीवली, विरार, नालासोपारा इथल्या स्थानकांवर अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.

पहाटे पाच वाजल्यापासून हा खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्या स्लो ट्रॅकवरून वळवण्यात आल्या आहेत, त्यामुळे गोंधळ उडाला आहे.

Web Title: Trains Are Running Late On Western Line Of Mumbai Local Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top