राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 10 September 2020

नागपूर चे माजी आयुक्त तुकाराम मुढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही बदली पुन्हा रद्द करण्यात आली आहे

मुंबई : राज्यातील सरकाराचा अजूनही सनदी अधिकाऱ्यांचा बदल्यांचा घोळ संपलेला दिसत नाही. त्यामुळे काल एका अधिकाऱ्याच्या बदलीचे चार तासांत दोन आदेश काढण्याचा प्रकार झाला. त्यात पुन्हा नागपूर चे माजी आयुक्त तुकाराम मुढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. ही बदली पुन्हा रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. ते पण स्वभावाने तिखट आहे. त्यांचा आणि मुंढे यांचा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता होती. मात्र मुंढे हे तेथे रूजू होण्याच्या आधीच त्यांची तेथील बदली रद्द झाली.. मुंढे हे कोरोनातून दोन दिवसांपूर्वीच बरे झाले आहेत. त्यामुळे ते लगेच कार्यभार स्वीकारणार नव्हते. तो स्वीकारायच्या आधीच तेथे इतर अधिकारी नेमण्यात आले.

जळगावचे जिल्हाधिकारी पदाचा कारभार पाहिलेले किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्याच्या कार्याबाबत गुलाबराव पाटील जाणून आहेत. मुंढे हे प्राधिकरणात आल्यानंतर या दोघांत वादाच्या ठिणग्या पडण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर पाटील यांनी माझे आणि मुढे यांचे काम पाणी पुरविण्याचे आहे. त्यामुळे आमच्या दोघांत आग कशी लागेल, असा सवाल करत मुंढेंच्या नियुक्तीला विरोध नसल्याचे स्पष्ट केेले होते. प्रत्यक्षात त्यांनी मुंढे यांना टाळले तर नाही ना, अशी चर्चा आता मंत्रालयात आहे. 

राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या

एम. जे. प्रदीप चंद्र - व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर

ई रवींद्रन - सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई 

अनिल डिग्गीकर - विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प मुंबई या रिक्त पदावर काल दुपारी करण्यात आली होती. या नियुक्तीचा आदेश चार तासांत फिरवून त्यांना म्हाडाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

विवेक जॉन्सन - अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांची नियुक्ती प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा उपविभाग या पदावर नियुक्ती

अमित सैनी - महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ मुंबई या रिक्त पदावर 

श्री दीपक कुमार मीना -  जिल्हाधिकारी गोंदिया या पदावर 

एस राममूर्ती -  जिल्हाधिकारी बुलढाणा 

प्रशांत नारनवरे - आयुक्त समाजकल्याण कल्याण, पुणे, या पदावर (श्री प्रवीण दराडे यांच्या जागी)

------------------------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer sessions for senior state officials continue Transfer of Tukaram Mundhe canceled