मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक; वाचा सविस्तर बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क 
Wednesday, 2 September 2020

एकूण 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. 

मुंबई - राज्यातील गणेशोत्सवानंतर गृहविभागाकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे बोलले जात होते. आज या बदल्या झाल्या आहेत. मुंबईच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर नवी मुंबईच्या पोलिसआयुक्तपदी बिपीन सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.  एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. 

राज्यातील महत्वाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या-

बिपीनसिंग - नवी मुंबई आयुक्त 
रजनीश सेठ - महासंचालक लाचलुचपतप्रतिबंधक विभाग 
दीपक पांडे - आयुक्त नाशिक 
प्रताप दिघावकर - महानिरिक्षक नाशिक विभाग 
लोहिया कोल्हापूर - विभाग 
कृष्णप्रकाश  - आयुक्त पिंपरी चिंचवड

---------------------------------------

( बातमी अपडेट होत आहे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of senior police officers in Mumbai