भक्ती पार्क मेट्रो स्टेशनसाठी पुन्हा झाडांची कत्तल

एमएमआरडीएच्या संपूर्ण एक हेक्टर भूखंडावरील खारफुटी कापण्याच्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भक्ती पार्क स्थानक एलिव्हेटेड असणार आहे.
Bhakti Park
Bhakti ParkSakal

मुंबई - मुंबई मेट्रो (Mumbai Metro) मार्गिका 4 वडाळा ते कासारवडवली यादरम्यान 32 किमी लांबीचा उन्नत मार्ग तयार केला जात आहे. या मार्गातील वडाळा येथील भक्ती पार्क (Bhakti Park) येथे मेट्रोचे स्थानक (Metro Station) तयार केला जात असून त्यासाठी तब्बल 1 हेक्टर खारफुटी झाडांची कत्तल (Tree Cutting) करण्यात येणार आहे. मात्र, स्थानक उन्नत बनविण्यात येणार आहेत. त्यामुळे जमिनीवरील खारफुटीची झाडे कशासाठी तोडण्यात येत आहेत, अशा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित करून 1 हेक्टर खारफुटीची कत्तल करण्यास विरोध केला जात आहे. (Tree Cutting for Bhakti Park Metro Station)

मुंबई उच्च न्यायालय आणि इतर सर्व विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. मेट्रो 4 मधील या एकाच पट्ट्यात खारफुटीची झाडे आहेत. या भागात कमी गर्द खारफुटीची झाडे आहेत. वनविभागाकडून वनीकरण हाती घेऊन झाडांची लागवड करणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने सांगण्यात आले.

Bhakti Park
प्रदीप शर्माकडेही सापडली सचिन वाझेसारखीच रिव्हॉल्वर

एमएमआरडीएच्या संपूर्ण एक हेक्टर भूखंडावरील खारफुटी कापण्याच्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भक्ती पार्क स्थानक एलिव्हेटेड असणार आहे. त्यामुळे फक्त पिलर्स आणि खांबासाठी आसपासची खारफुटी झाडे तोडण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे इतर खारफुटी झाडांचा बचाव होईल. मात्र, खांब आणि पिलर्ससाठी 1 हेक्टरवरील खारफुटी झाडे तोडणे चुकीचे आहे, असे पर्यावरणवादी झोरू भठेना यांनी सांगितले.

केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे. एक रेषीय प्रकल्प असल्याने त्याला काम करण्याची परवानगी दिली आहे. मेट्रोला अटी-शर्तीवर काम करायचे आहे. मुंबई उच्च न्यायालयातून खारफुटी तोडण्यासाठी मिळाली आहे. तर, भारत सरकारच्या अंतिम मान्यतेनंतर झाडे कटाईची भरपाई म्हणून आम्ही आमच्या मोहिमेत वनीकरण करून झाडे लावण्यात येणार आहेत.

​- वीरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभाग

भक्ती पार्क स्थानक एलिव्हेटेड बनणार असल्याने 1 हेक्टर जागा लागणे आणि त्यासाठी या जागेवरील झाडांची कत्तल करणे चुकीचे आहे. वडाळा येथील बेस्ट डेपो, ट्रक टर्मिनल येथे स्थानक बनण्याइतकी जागा आहे. फक्त पिलर्ससाठी असंख्य झाडांची कत्तल करणे योग्य नाही. खारफुटीचे क्षेत्र आता बळकावले जात आहे.

- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती

Bhakti Park
"तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही..."; शिवसेनेला 'चॅलेंज'

- मेट्रो 4 प्रकल्प 32 किमी लांबीचा तयार करण्यात येणार असून यामधील 1.2 किमी भाग भक्ती पार्कचा असणार आहे.

​- भक्ती पार्क स्थानक उभारण्यासाठी एकूण 48 पिलर्स उभे केले जाणार यासाठी 1 हजार 200 चौ.मी. जागा लागणार आहे.

- या प्रकल्पासाठी एकूण 357 झाडे तोडण्यात येणार आहेत.

- वन विभागाद्वारे इतर भागात झाडे कटाईची भरपाई म्हणून 4 हजार 444 झाडे लावली जाणार आहेत.

- 21 मे 2022 या कालावधीपर्यंत एमएमआरडीए प्रशासनाला झाडे कटाईची परवानगी देण्यात आली आहे.

- प्रकल्पांतर्गत खारफुटी क्षेत्रात काम करताना नदी, नाले याचे मार्ग बंद होणार नाही. वन्यप्राण्यांचे ये-जा करण्याचे मार्ग बंद होणार नाही, याची दक्षता एमएमआरडीएला घेण्यास सांगण्यात आले आहे.

- एकूण 13 अटी आणि शर्ती मान्य करून एमएमआरडीएला परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई मेट्रो लाईन 4 वडाळा ते कासारवडवली 32 किमी लांबीचा एलिव्हेटेड काॅरिडोर आहे. या मार्गात एकूण 32 स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 14 हजार 14 हजार 500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, मध्य रेल्वे, मोनो रेल्वे आणि सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गांमध्ये परस्पर जोडण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com