बदलापूरमधील ट्रेकरचा उत्तराखंडमध्ये मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

बदलापूर पूर्वेकडील कुळगाव सोसायटीत राहणारा हर्षद 7 जूनला 12 सहकाऱ्यांसह उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगला गेला होता. त्यापैकी चौघे बदलापूरचे तर आठ जण राज्याच्या विविध भागांतील होते. दोन परदेशी ट्रेकर्सही त्यांच्यासोबत होते.

बदलापूर : उत्तराखंडमधील बारासुपा परिसरात ट्रेकिंग करताना श्‍वास घेण्यास त्रास झाल्याने बदलापूरमधील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हर्षद दत्तात्रय आपटे (33) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 

बदलापूर पूर्वेकडील कुळगाव सोसायटीत राहणारा हर्षद 7 जूनला 12 सहकाऱ्यांसह उत्तराखंडमध्ये ट्रेकिंगला गेला होता. त्यापैकी चौघे बदलापूरचे तर आठ जण राज्याच्या विविध भागांतील होते. दोन परदेशी ट्रेकर्सही त्यांच्यासोबत होते. 9 जूनला त्यांनी ट्रेकिंगची सुरुवात केली. शुक्रवारी (ता.15) ट्रेक संपवून ते बेस कॅम्पकडे परतत होते; मात्र वाटेत शेवटचा टप्पा असलेल्या बारासुपा येथे हर्षदला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याला तातडीने खाली आणण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हर्षदने यापूर्वी महाराष्ट्रातील विविध गड-किल्ले त्याने यापूर्वी सर केले होते. तो हिमालयात प्रथमच हिमालयात गेला होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A trekker of Badlapur died in Uttarakhand