विकास दुबेच्या एन्काउंटरवर एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा म्हणतात, हा एन्काउंटर तर...

सुमित बागुल
Friday, 10 July 2020

आठ पोलिसांची हत्या करणारा उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज सकाळी साडे सहा वाजता एन्काउंटर करण्यात आलाय.

मुंबई : आठ पोलिसांची हत्या करणारा उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबे याचा आज सकाळी साडे सहा वाजता एन्काउंटर करण्यात आलाय. विकास दुबे याला काल उजैनमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. आज त्याला उजैनमधून उत्तर प्रदेशात घेऊन जाण्यात येत होतं. दरम्यान कानपूरला नेताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला.

या अपघाताचा फायदा उचलत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शरण येण्यास देखील सांगितलं मात्र पोलिसांची चोरून पाळणाऱ्या विकास दुबेने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत केला. या दरम्यान पोलिसांनी विकास दुबईचा एन्काउंटर केलाय. याप्रकरणी आता विविध प्रतिक्रिया येण्यास सुरवात झालीये.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याप्रकरणी प्रतिक्रिया दिलीये. संजय राऊत यांनी विकास दुबेच्या एन्काउंटरवर राजकारण नको अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

मोठी बातमी - विकास दुबे एन्कॉंन्टर प्रकरणी संजय राऊतांची मोठी प्रतिक्रीया, वाचा सवित्तर

काय म्हणालेत प्रदीप शर्मा : 

याबाबत एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी देखील भाष्य केलाय. प्रदीप शर्मा यांनी पोलिसांचं समर्थन केलंय. हा एन्काउंटर खरा खुरा वाटत असल्याची प्रतिक्रिया प्रदीप शरम यांनी दिलीये. आता समोर येणारे सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते ज्यावेळी विकास दुबेच्या हल्यात 8 पोलिस शहीद झाले तेव्हा कुठे होते? असा सवालही त्यांनी विचारलाय. 

प्रदीप शर्मा यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख आहे. 1983 मध्ये ते पोलिस सेवेत रुजू झाले. मुंबई बॉम्बस्फोट प्रकारांतील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह लष्करच्या इतरही अनेक अतिरेक्यांचा त्यांनी एन्काउंटरमध्ये खात्मा केलाय. रफीक डबा, विनोद मटकर, सादिक काल्या या कुख्यात गुंडाना देखील त्यांनी यमसदनी घडलंय. पोलिस सेवेत सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नालासोपाऱ्यातून त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवलीये. 

trending story reaction of pradip sharma on vikas dubey encounter


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trending story reaction of pradip sharma on vikas dubey encounter