esakal | रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार
sakal

बोलून बातमी शोधा

रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार

रायगड जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या भाजीपाला व मासळी विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार

sakal_logo
By
अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा


पाली, : रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार (ता. 16)पासून सुरू 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे; मात्र यामुळे रायगड जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या भाजीपाला व मासळी विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गटारी असूनही मटनाच्या विक्रीत मोठी घट वाचा 'हे' आहे कारण...

वारंवार होणारा लॉकडाऊन आदिवासी व गरीब विक्रेत्यांना परवडणारा नाही. सध्या रानभाज्या व गोड्या मासळीचा हंगाम सुरू आहे. आदिवासी बांधव रानातून भाजीपाला व नदी ओहळातून मासळी पकडून ती घेऊन बाजारात विक्रीसाठी येतात; मात्र लॉकडाऊनमुळे हा हंगाम जात असून, त्यांचा रोजगारही हिरावतो. सुधागड तालुक्यातील वंदना वारे या आदिवासी भाजी विक्रेत्याने सांगितले की, कोरोनाच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन ठीक आहे; मात्र हातात कामधंदा नाही तर घरी बसून रोजचे पैसे आणायचे कुठून, असा सवाल त्यांनी केला आहे. शनिवारी (ता. 18)पासून सकाळी 6 ते 11 भाजी, मासळी विकण्यास परवानगी मिळाली आहे; मात्र लॉकडाऊन असल्यामुळे सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद आहे. अशावेळी डोंगर खोऱ्यात राहणारे आदिवासी बाजारापर्यंत आपला भाजीपाला कसा आणणार, असे वामन वारे या आदिवासी बांधवांनी सांगितले. 

नवी मुंबईच्या नव्या आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; कोविड नियंत्रणासाठी कसली कंबर! वाचा सविस्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सुरक्षेसाठी केलेल्या लॉकडाऊनला आमचा विरोध नाही; मात्र सरकारने हातावर पोट असणाऱ्यांचाही विचार केला पाहिजे. त्यांची रोजीरोटी सुरू ठेवण्यासाठी काही सूट दिली पाहिजे. तसेच रोहयोतून व इतर शासकीय योजनांतून हाताला काम दिले पाहिजे. 
- रमेश पवार, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तथा अध्यक्ष, अनुसूचित जमाती, रायगड, लोकसंजीवनी प्रतिष्ठान 

loading image
go to top