

Tribal women tie a bamboo Rakhi to the Governor.
Sakal
विरार : रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेवा विवेक ग्राम विकास केंद्र, पालघर यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आदिवासी भगिनींना महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सन्मानपूर्वक लोकभवन, मुंबई येथे निमंत्रित केले.होते. यावेळी आदिवासी भगिनींनी राज्यपालांना प्रेम, स्नेह आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेली बांबू राखी बांधून रक्षाबंधनाचा स्नेहबंध दृढ केला.बांबूपासून आदिवासी भगिनींनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेली ही राखी केवळ रक्षाबंधनाचे प्रतीक नसून आदिवासी महिलांच्या स्वावलंबनाची, कौशल्याची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे.