esakal | महामार्गावर तिहेरी अपघात,प्रवाशी बस मधील तीन जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

accident

महामार्गावर तिहेरी अपघात,प्रवाशी बस मधील तीन जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातिवली गावच्या हद्दीत सकाळी आठ वाजताच्या सुमारास तिहेरी अपघात झाला होता.भरधाव वेगातील प्रवाशी बसने टेम्पोला धडक दिली,त्याच वेळी बसच्या पाठीमागून येणारा कंटेनरही टेम्पोला धडकला.अपघातात प्रवाशी बसचा क्लिनर आणि बस मधील दोन प्रवाशी जखमी झाले होते.प्रवाशी बस मध्ये पन्नास प्रवासी होते.जखमींना उपचारासाठी मनोरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाता स्थळावरून टेम्पोचा चालक पळून गेला होता.

कैफ ट्रॅव्हल्सची प्रवाशी बस पन्नास प्रवाशी घेऊन मुंब्रावरून सिल्वासा येथे जात असताना सातीवली गावच्या हद्दीत (MH43H4255)पहिल्या मार्गिकेतून गुजरातच्या दिशेने जात असताना बसच्या पुढे दुसऱ्या मार्गिकेवर चालणारा टेम्पो (MH04HY1654) अचानक पहिल्या मार्गिकेवर आल्याने भरधाव वेगातीला बसने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला.याच वेळी बसच्या पाठीमागून येत असलेला कंटेनर (RJ02GB3771) अपघात ग्रस्त टेम्पोला धडकुन तिहेरी अपघात झाला होता.अपघातात तीन जण जखमी झाले होते.

प्रवाशी बसचा क्लीनर सारिक अमानुल्ला खान (वय.17) कुशनुद अब्बास (वय.33)आणि शमीम युसूफ खान (वय.34)जखमी झाले होते. उपचारासाठी मनोरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top