esakal | TRP गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

TRP गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुन्हा दाखल

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट(टीआरपीमध्ये) गेरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केला आहे.  मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून ईडीने हा गुन्हा दाखल केला

TRP गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई - टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट(टीआरपीमध्ये) गेरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केला आहे.  मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यावरून ईडीने हा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील आठवड्यापासून चौकशीला सुरूवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा - ठाण्यातील जाहिरात बॅनर होर्डीग्जची चौकशी; अनाधिकृत होर्डींग्जना दणका

भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) ही संस्था भारतीय माहीत व प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते. ही संस्था दावा करते की, ते 32 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय टीव्हीवरील जाहिराती उद्योगाला उपयुक्त माहिती पुरविते. या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते. बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणार्यांना पैसे देतात.

हेही वाचा - वीजबिल 50 टक्के माफ करा; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी मनी लाँडरींग व हवाला व्यवहाराचा उल्लेख आल्यामुळे याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी झालेल्या कथित मनी लाँडरींगप्रकरणी ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. त्या बाबींवर ईडी तपास करणार असून पुढील आठवड्यापासून याप्रकरणी ईडी चौकशीसाठी समन्स पाठवण्यास सुरूवात करणार आहे.

TRP scam case filed by the Directorate of Recovery ED

( संपादन - तुषार सोनवणे )