Mumbai News : ट्रक चालकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन!

सोमवारी मालवाहतूक ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे मालवाहतूक क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याची भीती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने व्यक्त केली आहे.
Transport-Trucks
Transport-Truckssakal

मुंबई - केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्या विरोधात सोमवारी मालवाहतूक ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे मालवाहतूक क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याची भीती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने व्यक्त केली आहे.

यांसदर्भात मंगळवारी एआयएमटीसीने तातडीने बैठक बोलविण्यात आली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी केले आहे.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) ने अलीकडेच हिट ॲन्ड रन केस प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या ट्र्क चालकांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद लागू केल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या कायद्यामुळे महामार्गांवर अचानक आणि मोठ्या प्रमाणात ट्र्क चालकांचे निदर्शने झाली, रस्ते अडवले गेले आणि वाहनचालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला.

त्यामुळे मालवाहतूक क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. केंद्र सरकराने नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रकचालकांनी स्वतःहून संप पुकारला आहे. त्यामुळे रस्ते मालवाहतूकीवर परिणाम पडणे सुरु झाले आहे. यासंदर्भात मंगळावरी दिल्लीला एक आपत्कालीन बैठक आयोजित केली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी केले आहे.

मालवाहतूक ट्रक चालकांना या गंभीर काळात संतुलन राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. अनौपचारिक चर्चा करणे आणि यावर तोडगा काढणे हे आमचे मुख्य ध्येय असल्याची माहितीही कोअर कमिटीचे अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी सकाळला दिली आहे.

राज्यात सुरु असलेल्या ट्रक चालकांच्या संपाचा परिणाम पेट्रोल डिझेल वितरणावर होणार आहे. सोमवारी सुरु झालेल्या संपामुळे कित्येक ठिकाणी पेट्रोल डिझेल पोहोचू शकले नाही. पेट्रोल मिळालेच नाही तर लहान पेट्रोलपंप आहेत ते सकाळी आणि मोठे पेट्रोलपंप  दुपारपर्यंत बंद होतील.

- चेतन मोदी, अध्यक्ष, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com