विरारजवळ डंपर व खासगी बसला भीषण अपघात; बसमधील प्रवासी जखमी

विजय गायकवाड
Wednesday, 12 August 2020

विरार पूर्वेकडील शिरसाड अंबाडी रोडवर डंपर व खासगी बसला भीषण अपघात झाला आहे.  यात खासगी बस मधील 15 प्रवाशी जखमी झाले असून 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

 

नालासोपारा :- विरार पूर्वेकडील शिरसाड अंबाडी रोडवर डंपर व खासगी बसला भीषण अपघात झाला आहे.  यात खासगी बस मधील 15 प्रवाशी जखमी झाले असून 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. आज सकाळी साडे आठच्या  सुमारास हायवा डंपर हा अंबाडीच्या दिशेने भरधाव वेगाने ओव्हरटेक करीत जात असताना, गणेशपुरीकडून वसईच्या वालीव येथील कामगारांना घेवून बस निघाली होती. इतक्यात चांदीप-पारोळ दरम्यान डंपरने जोरदार धडक दिली.

दुध भेसळीविरोधात होणार कठोर कारवाई; दुग्धविकास मंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

या अपघातातदोन महिला गंभीर जखमी झाल्या असून 14 प्रवाशी किरकोळ जखमी झालेत. दोन्ही गाड्यांच्या चालकांना किरकोळ मार लागला असून सर्व प्रवाशांना हायवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनेक रुग्णवाहिकांना फोन करून सुद्धा एकही रुग्णवाहिका आली नाही. स्थानिक रिक्षा व खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती मात्र मांडवी परिक्षेत्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांनी तात्काळ  क्रेन आणून वाहतूक सुरळीत केली.

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truk and private bus near Virar; The passenger in the bus was injured