आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा : तृप्ती तोरडमल

गजानन चव्हाण 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

 खारघर : कोणत्याही क्षेत्रात मेहनत करावी लागते. त्या शिवाय यश मिळत नाही. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा परंतु आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असा सल्ला अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी व्यासपीठावर सविता दामोधर परांजपे सिनेमाच्या डायरेक्टर स्पप्ना जोशी, महाविद्यालयाच्या अधिकारी शीतल बुकावर उपस्थित होत्या.

 खारघर : कोणत्याही क्षेत्रात मेहनत करावी लागते. त्या शिवाय यश मिळत नाही. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा परंतु आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा असा सल्ला अभिनेत्री तृप्ती तोरडमल यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी व्यासपीठावर सविता दामोधर परांजपे सिनेमाच्या डायरेक्टर स्पप्ना जोशी, महाविद्यालयाच्या अधिकारी शीतल बुकावर उपस्थित होत्या.

खारघर मधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिनेत्री तृप्ती तोरडमल आणि स्पप्ना जोशी ह्या सकाळ यीनच्या उपक्रमा विषयी विध्यार्थ्यांशी सवांद साधण्यासाठी महाविद्यालयात आल्या होत्या. यावेळी अभिनेत्री तोरडमल यांनी सकाळ वृत्तपत्र हे विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व वाढावे यासाठी उपक्रम घेत असतात. शिक्षण घेत असताना कला क्षेत्रातही काम करता येते. मात्र त्यासाठी ज्या प्रकारे मन लावून अभ्यास करता. त्याचे प्रमाणे कला क्षेत्रातही काम करावे लागते जन्मताच देव आपल्या मध्ये सर्व कला गुण देवून पाठवितो. त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा मात्र आपल्या आई वडिलांचे स्वप्ना पूर्ण करा असा सल्ला दिला.

स्पप्ना जोशी म्हणाल्या सकाळ यीनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाते. हा तरुणासाठी सकाळने उपलब्ध करून दिलेले एक व्यासपीठ आहे. विदयार्थ्यांनी या उपक्रमात जरून सहभागी भाग घ्यावे. तसेच 1 आगस्टला रिलीज होणाऱ्या 'सविता दामोधर परांजपे' हा सिनेमा आवर्जून पहा असेही सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे उत्तरे तृप्ती आणि स्वप्न या दोघींनी दिल्या. यावेळी विधार्थाना सीमेचे ट्रेलर दाखविण्यात आले. या कार्यक्रमाला विद्य़ार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विद्यार्थी हे बारावी नंतर अभियांत्रिक शाखेत प्रवेश केलेले आहे. यांच्यासाठी सकाळ यीनचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्याना एक व्यासपीठ उपलब्ध होते.त्यातून अनेक विधार्थ्याचा व्यक्तीमत्व विकासात भर पडते.
- चेतन ठाकूर, कार्यक्रम, अधिकारी सरस्वती महाविद्यालय
 

Web Title: trupti inspired student to complete their parents dream in yin