esakal | ठाण्यात हाय वे वर २० हजार किलो टॅामेटो भरलेला ट्रक पलटी
sakal

बोलून बातमी शोधा

Tomato Truck Accident

ठाण्यात हाय वे वर २० हजार किलो टॅामेटो भरलेला ट्रक पलटी

sakal_logo
By
नरेश शेंडे

मुंबई: ठाण्याच्या पूर्व दृतगती मार्गावर (Thane Eastern Express highway) टॅामेटोने भरलेल्या ट्रकचा (Truck) अपघात झाला आहे. या ट्रकमध्ये असलेले तब्बल २० हजार किलो टॅामेटो (Tomato) रस्त्यावर पडले आहेत. कोपरीजवळ (kopari) ट्रकचा ताबा सुटल्याने टॅामेटोने भरलेला ट्रक रस्त्यावर कोसळला. हा अपघात शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात एक जण जखमी (One Injured) झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती ठाणे महापालिकेने (Thane Municipal) दिली आहे. टॅामेटोचा मोठा साठा रस्त्यावर पसरल्याने पूर्व दृतगती मार्गावर दोन्ही लेनवर वाहतूक ठप्प (Traffic Jam) झाली आहे. संबंधित विभागाकडून रस्ता वाहतूकीसाठी पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. ( Twenty Thousand kilos tomato caring truck collapse on Thane Eastern Express highway one injured-nss91)

loading image