esakal | गोरेगावमध्ये पोलिस कारवाईच्या नावाने खंडणी मागणारे दोघे अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

गोरेगावमध्ये पोलिस कारवाईच्या नावाने खंडणी मागणारे दोघे अटकेत

पिंपळाचे झाड तोडले, एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करु नये पोलिस कारवाई न करण्यासाठी  गोरेगाव येथील एका व्यक्तीकडून खंडणी मागणाऱ्या दोघा खंडणीखोरांना गोरेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गोरेगावमध्ये पोलिस कारवाईच्या नावाने खंडणी मागणारे दोघे अटकेत

sakal_logo
By
राजू परुळेकर

मुंबईः  पिंपळाचे झाड तोडले, एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करु नये पोलिस कारवाई न करण्यासाठी  गोरेगाव येथील एका व्यक्तीकडून खंडणी मागणाऱ्या दोघा खंडणीखोरांना गोरेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना स्थानिक न्यायालयात नेले असता त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश गोस्वामी यांनी सांगितले. 

तक्रारदार गोरेगाव येथील मोतीलालनगरमधील रहिवासी आहे.  त्यांच्या घरासमोरच एक पिंपळाचे घर होते. ते झाड पडले होते, याबाबत शासन या नावाने ट्विटरवर अज्ञात व्यक्तीने ट्विट केले होते. यादरम्यान त्यांच्या एका मित्राला संबंधित व्यक्तीने फोन करुन त्यांच्या मित्राने ते पिंपळाचे झाड तोडले असून त्यांच्यावर एमआरटीपी कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार आणि त्यांना या गुन्ह्यांत अटक केली जाईल अशी धमकी दिली.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

इतकेच नव्हे तर त्यांच्याविरुद्ध मीच ट्विट केल्याचेही सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने तक्रारदारांना फोन करुन तो पत्रकार असल्याचे सांगून ते अडचणीत येऊ नये असे वाटत असल्यास त्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील अशी धमकी दिली. यावेळी तक्रारदार पंधरा हजार रुपये देण्यास तयार झाले. मात्र त्यांनी 30 हजारांच्या मागणीसाठी त्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिष गोस्वामी यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला.

अधिक वाचा- आजपासून अरबी समुद्रात सुरु होणार मलबार नौदल कवायतींचा दुसरा टप्पा

त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच हरिष गोस्वामी यांच्या पथकातील वेदपाठक, किसवे, कर्पे, म्हेत्रे, बिटके, पादीर यांनी पाच हजार रुपयांचा हप्ता घेण्यासाठी आलेल्या राकेश आणि ललेश या दोघांनाही गोरेगाव परिसरातून अटक केली. हे आरोपींची अजून कुणाला अशाप्रकारे पोलिस कारवाईच्या नावाने धमकावून खंडणी उकळलेली आहे काय याचा शोध पोलिस घेत आहेत.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Two arrested for demanding ransom in Goregaon

loading image
go to top