Varali Sea : वरळीत समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू; तिघांवर उपचार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Worli Sea Beach

मुंबईतील वरळी भागात शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी समुद्रात खेळायला उतरलेल्या 5 मुलांपैकी दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Varali Sea : वरळीत समुद्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू; तिघांवर उपचार सुरू

मुंबई - मुंबईतील वरळी भागात शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी समुद्रात खेळायला उतरलेल्या 5 मुलांपैकी दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन मुलांना केईएम आणि हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्तिक चौधरी आणि सविता पाल अशी मृत मुलांची नावे आहे. कार्तिकी गौतम पाटील ,आर्यन चौधरी आणि ओम पाल या तीन मुलांचे सुदैवाने प्राण वाचले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार वसाहतीजवळ शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास पाच मुला खेळता खेळता समुद्रात बुडल्याची घटना घडली. दुपारी 3.40 च्या सुमारास स्थानिकांकडून अग्निशमन दलाला फोन आला आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, तोपर्यंत स्थानिकांनी मुलांना समुद्रातून बाहेर काढत मुलांना जवळच्या हिंदुजा आणि केईएम रुग्णालयात नेण्यात आले. हिंदुजा रुग्णालयात दोन मुलाना नेण्यात आले परंतु दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. बाकी तीन मुलांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या वर उपचार सुरू आहे

कार्तिक चौधरी आणि सविता पाल यांना दादरच्या हिंदुजा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. कार्तिकी गौतम पाटील यांना तातडीने परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आर्यन चौधरी आणि ओम पाल यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.