

Allegations of Voter Confusion as Two-EVM Decision Draws Criticism
Sakal
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये प्रथमच पॅनेल पद्धतीने मतदान होणार असून, या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) संख्येबाबत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नारायण पाटील यांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.