esakal | वरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू; अनेक जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीत लिफ्ट कोसळून ५ जणांचा मृत्यू; आदित्य ठाकरे घटनास्थळी

वरळीत लिफ्ट कोसळून ५ जणांचा मृत्यू; आदित्य ठाकरे घटनास्थळी

sakal_logo
By
सुरज सावंत

वरळी: राज्यभरात दरडी कोसळल्यामुळे दुर्घटना घडत असताना वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 35 वर्षीय व्यक्तीही गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती गंभीर असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

वरळी अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. त्यात या निर्माणाधीन इमारतीत संध्याकाळच्या सुमारास बांधकामासाठी वापरण्यात येणारी लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याची स्थिती गंभीर आहे.

आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे घटनास्थळी दाखल झाले आहेत. "प्रथमदर्शनी लिफ्ट ओव्हरलोडिंगमुळे कोसळल्याचे कळते. या ठिकाणी बचावकार्य अद्याप सुरु आहे," असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा: काय आहे वार्म व्हॅक्सीन? या लशीची एवढी चर्चा का होतेय?

दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अविनाश दास(35) याला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. याशिवाय लक्ष्मण मंडल(35) याच्यावर उपचार सुरू असून त्याची स्थीती गंभीर आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात भरत मंडल(28), चिन्मय मंडल(33) व 45 वर्षीय व्यक्तीला नेण्यात आले होते. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू आहे. काही जणआत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

loading image
go to top