esakal | नवी मुंबईकरांनो सावधान! कोरोनाचा विळखा वाढतोय... वाचा बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईकरांनो सावधान! कोरोनाचा विळखा वाढतोय... वाचा बातमी

शहरातील सीवूड्‌स आणि कोपरखैरणे परिसरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले. सीवूड्‌स सेक्‍टर 38 येथील एक वृद्ध काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथून प्रवास करून नवी मुंबईत आले होते. त्यांना काही दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले होते. त्याचे अहवाल आज मिळाल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. वाशीतील मशिदीत नमाज अदा करायला जाणाऱ्या कोपरखैरणे येथील 45 वर्षीय रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले.

नवी मुंबईकरांनो सावधान! कोरोनाचा विळखा वाढतोय... वाचा बातमी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : शहरातील सीवूड्‌स आणि कोपरखैरणे परिसरातील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले. सीवूड्‌स सेक्‍टर 38 येथील एक वृद्ध काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथून प्रवास करून नवी मुंबईत आले होते. त्यांना काही दिवसांपासून क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले होते. त्याचे अहवाल आज मिळाल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाशीतील मशिदीत नमाज अदा करायला जाणाऱ्या कोपरखैरणे येथील 45 वर्षीय रहिवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. मंगळवारी शहरात नेरूळ भागात दोन आणि वाशीमध्ये एक असे एकूण तीन कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले होते. तेव्हा नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा 11 पर्यंत गेला होता; परंतु आता या दोन्ही रुग्णांमुळे नवी मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 13 पर्यंत पोहचली आहे. खबरदारीचे उपाय म्हणून महापालिकेने या सीवूड्‌स आणि कोपरखैरणे भागातील इमारती सील केल्या आहेत. नागरिकांना पुढील 14 दिवस घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत.

Two new patients in Navi Mumbai

loading image