esakal | भिवंडीत चार मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Bhiwandi

भिवंडी, मौजे पिरानी पाडा, शांतीनगर, विनायक हॉटेल समोरील मनोहरा ही चार मजली बिल्डिंग इमारत धोकादायक स्थितीत होती. या इमारतीमधील एकुण २२ कुटुंबे राहत होती. रात्री बाराच्या पुर्वी तिथे राहत असलेल्या कुटुंबांना अग्निशमन दल व प्रशासनमार्फत इमारतीतून स्थलांतरीत केले होते.

भिवंडीत चार मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडीतील शांतीनगर भागात मध्यरात्री दीडच्या सुमारास चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी आहेत.

भिवंडी, मौजे पिरानी पाडा, शांतीनगर, विनायक हॉटेल समोरील मनोहरा ही चार मजली बिल्डिंग इमारत धोकादायक स्थितीत होती. या इमारतीमधील एकुण २२ कुटुंबे राहत होती. रात्री बाराच्या पुर्वी तिथे राहत असलेल्या कुटुंबांना अग्निशमन दल व प्रशासनमार्फत इमारतीतून स्थलांतरीत केले होते. दरम्यानच्या काळात काही रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सदर इमारतीमध्ये शिरकाव केला. याच वेळी इमारत दुर्घटनाग्रस्त झाली.

घटनास्थळी पोलिस कर्मचारी, NDRF जवान, TDRF जवान, प्रादेशिक आ. व्य. कक्ष ठाणे, ठाणे म. न. पा. अग्निशमन दल व भिवंडी म.न.पा. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु आहे, तसेच तहसिलदार, तलाठी घटनास्थळी उपस्थित आहेत.

सिराज अकबर अहमद अन्सारी (वय- २६), मोहम्मद आकीब शेख (वय-२७) या दोघांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. जखमी व्यक्तींना इंदिरा गांधी स्मुर्ती रुग्णालय, भिवंडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top