
नवी मुंबई : उरण-पनवेल मार्गावर (Uran -panvel way) दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू (Two person died), तर एक जण गंभीर जखमी झाला. निष्काळजीपणे ट्रेलर उभे केल्यामुळे त्यांच्यावर पाठीमागून येणारी भरधाव वाहने धडकल्यामुळे (Accident) हे अपघात झाले आहेत. या अपघातानंतर दोन्ही ट्रेलरचालक पळून (two driver absconding) गेले आहेत. उरणच्या चिर्ले गावच्या हद्दीत शनिवारी रात्री उरण-पनवेल मार्गिकेवर अपघातात रामचंद्र रामबहोरी रहिदास (वय २५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रामचंद्र हा आशिषकुमार सरोज याच्यासोबत टँकरवर क्लिनर म्हणून काम करत होता. हे दोघेही द्रोणागिरी येथून पुणे येथे जात होते. या वेळी नवीन शिवडी न्हावा शेवा ब्रिजच्या जवळ ट्रेलरचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारा आशिषकुमार याचा टँकर त्यावर धडकला. या अपघातात आशिषकुमार व रामचंद्र गंभीर जखमी झाले होते.
पनवेल-जेएनपीटी मार्गावर करळ फाटा येथे ट्रेलरचालक सुनीलकुमार रामनारायण पटेल याचा अपघाती मृत्यू झाला. सुनीलकुमार हा शनिवारी मध्यरात्री ट्रेलर घेऊन जात असताना, करळ फाटा येथे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेला कंटेनर ट्रेलरवर धडकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.