esakal | मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...

हल्ली कॅब ऑन फोनची सुविधा आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. कुठेही जायचं असेल तर चटकन मोबाईल काढून कॅब बुक करतो आणि सहज प्रवास करतो.

मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : हल्ली कॅब ऑन फोनची सुविधा आपण मोठ्या प्रमाणात वापरतो. कुठेही जायचं असेल तर चटकन मोबाईल काढून कॅब बुक करतो आणि सहज प्रवास करतो. पण या कॅब कंपन्यांपैकी एका बड्या कपंनीने आपलं मुंबई ऑफिस आता बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. कारण आहे कोरोना. कोरोना आणि त्यासोबतच्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचं कंबरडं मोडलंय. आपण ज्या कंपनीबाबत आम्ही बोलतोय ती कंपनी आहे उबर.

मोठी बातमी मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीनंतर मोठा बदल, मुंबई पोलिसांनी घेतला आपला निर्णय मागे..

उबर ही देशातील सर्वात मोठ्या 'कॅब ऑन फोन' कंपन्यांपैकी एक कंपनी. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जर UBERचे ग्राहक असाल तर तुम्हाला उबरची सुविधा मिळत राहील. उबर कंपनीने आपलं मुंबईतील ऑफिस डिसेंबर महिन्यापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलंय. विविध इंग्रजी वेबसाईट्सवर याबाबत बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.   

दरम्यन ऑफिस जरी बंद ठेवण्याचा निर्णय झाला असला तरीही उबर आपल्या मुंबईतील ग्राहकांना अविरतपणे उत्तम सुविधा देतच राहील असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय. सूत्रांच्या दिलेल्या पुढील माहितीप्रमाणे 'राईड-हेलिंग' कंपनीने आपले जगभरातील ६७०० कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या तब्बल महिन्याभरानंतर उबरने मुंबईतील ऑफिस बाबत निर्णय घेतलाय.

मोठी बातमी -  नायर रुग्णालयातून आली सर्वात मोठी गोड बातमी, वाचा सविस्तर

कंपनीने जागतिक पातळीवर घेतलेल्या या निर्णयामुळे भारतातील ६०० कर्मचाऱ्यांना आपली नोरकरी गमावरी लागणार आहे. यामध्ये ड्रायव्हर स्पोर्टमधील कर्मचारी, लीगल आणि फायनान्स, मार्केटिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  

uber shuts its mumbai office costumers will get service from uber

loading image