Dombivli MIDC Blast : आचारसंहिता होती अन्यथा...डोबिंवलीतील MIDC हलवण्याबाबत उद्योगमंत्र्यांचं मोठं विधान

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीत एका केमिकल कंपनीच झालेल्या भीषण स्फोटानंतर खळबळ उडाली आहे.
Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC BlasteSakal

डोंबिवली एमआयडीसीत एका केमिकल कंपनीच झालेल्या भीषण स्फोटानंतर खळबळ उडाली आहे. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला ३५ ते ४० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले, यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील इमारतींचे देखील मोठे नुकसान झाले. (Dombivli MIDC Blast Latest Updates in Marathi)

या घटनेनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आहे. जवळपास आग आटोक्यात आली आहे. एक ते दीड तासात आग पूर्णपणे आटोक्यात येईल. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. जे जखमी आहेत त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील, त्यांचा खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

घटना दुर्देवी आहे, या घटनेच्या मागे नियमबाह्य काही झालं आहे का हे तपासण्याच्या सूचना मी फायर ब्रिगेडला दिल्या आहेत. यामध्ये कोणी दोषी आढळलं तर त्यावर कारवाई केली जाईल असेही सामंत यांनी सांगितले.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast: डोबिंवली एमआयडीसीत भीषण स्फोट, आग रोखण्यासाठी कोणते सोपे उपाय करावे, वाचा एका क्लिकवर

डोंबिवली भागात आम्ही काही दिवसांपासून काम करत होतो, या केमिकल कंपन्या बाहेर स्थलांतरीत करण्यासाठी जागा मिळत नव्हती. पण या वर्षभरात आपण जागा मिळवली आहे. आचारसंहिता असल्याने या जागांचं वाटप झालेलं नाही, चार तारखेनंतर या जागांचे वाटप होईल. ज्या धोकादायक केमिकल कंपन्या शिफ्ट करण्याची डोंबिवलीवासीयांची मागणी आहे, त्याबद्दल धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. ती कारवाई चार तारखेनंतर सुरू करू असेही उदय सामंत म्हणाले.

अंबरनाथ येथे शेकडो एकर जागा आपण संपादीत केली आहे, आता फक्त उद्योजकांचे मन वळवून ती जागा देणं बाकी राहिलं आहे, असेही उदय सामंत म्हणाले. जखमींचा आकडा अजून कळला नाहीये, पण स्फोटामुळे कंपनीच्या आजूबाजूला देखील लोक जखमी झाले आहेत, त्यांचा खर्च देखील शासन करेल असेही सामंत यावेळी म्हणाले.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast: एक स्फोट... जमीन हादरली, संपूर्ण कंपनी बेचिराख; साखरपुडा सोडून लोक सैरावैरा पळू लागले

केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे, यामुळे आजूबाजूला देखील मोठं नुकसान झालं आहे. लोकांच्या घराच्या काचा फुटल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती घटनास्थळी दाखल झालेले शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, यापूर्वीही मागे अशा घटना घडल्यानंतर वेगवेगळ्या उपाय योजना केल्या गेल्या. पण आता जेव्हा बॉयलरचा स्फोट होतात तेव्हा आता त्याचा निर्णय आता सरकारला घ्यावा लागेल. धोकादायक कंपन्या आहेत त्यांना शहराच्या बाहेर स्थलांतरीत केल्या जाव्यात अशी सर्वांची मागणी आहे. याबद्दल सरकर लवकरच निर्णय घेईल, ज्या कंपन्यांमध्ये स्फोट होत आहेत त्या निवसी भागातून पर्मनंट शहराबाहेर शीफ्ट केल्या जातील असेही खासदार श्रीकांच शिंदे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com