गोळीबार नगरच्या पुनर्विकासासाठी आंदोलन; मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा

bjp strike
bjp strikesakal media

मुंबई : सांताक्रूझ पूर्वेकडील (santacruz golibar road) गोळीबार रोड येथील झोपडपट्टी पुनर्विकासाची (slum redevelopment scheme) योजना शिवालिक व्हेंचर्स या विकासकाने (builder) गेली 14 वर्षांपासून रखडवली आहे. सरकारने तातडीने हा प्रकल्प ताब्यात घेऊन रहिवाशांना दिलासा द्यावा या मागणीसाठी शनिवारी (ता. 21) रहिवाशी आणि भाजपाने आंबेवाडी बुद्धविहारासमोर आंदोलन (strike) केले. या आंदोलनात आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी सहभागी होऊन या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत (uddhav Thackeray) चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.

bjp strike
झाडे जगण्याचे प्रमाण देशात 80% ; महापालिकेत मात्र 54 टक्के; 'CAG'चा ठपका

खार पूर्वेकडील गोळीबार मार्गावरील पंचशील सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास शिवालिक डेव्हलपर्स या कंपनीने 14 वर्षांपूर्वी हाती घेतला होता. योजना राबविण्यासाठी येथील रहिवाशांच्या तात्पुरत्या वास्तव्यासाठी याच परिसरात संक्रमण शिबीर उभारले. या शिबिराची मुदत उलटून गेली तरी आहे त्याच घरांमध्ये नागरिकांना वास्तव्य करावे लागत आहे. संक्रमण शिबिराची डागडुजी होत नसल्याने धोकादायक स्थितीत रहिवाशांना रहावे लागत आहे. अशा विविध समस्यांबाबत रहिवाशी एसआरए अधिकाऱ्यांकडे तक्रार करत आहेत. तरीही विकासकावर कारवाई होत नसल्याने रहिवाशी हतबल झाले आहेत.

विकासकावर कारवाई करून रहिवाशांना दिलासा द्यावा, संक्रमण शिबिराची दुरावस्था झाली त्याची तातडीने दुरुस्ती करावी, रहिवाशांना भाडे द्यावे, पुनर्विकास तातडीने सुरु करावा आदी मागण्यांसाठी रहिवाशांनी आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सहभाग घेतला. रहिवाशांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

bjp strike
गोमूत्र शिंपडण्यापेक्षा तरुणांना रोजगार द्या; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

रखडलेल्या पुनर्विकासाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतरही विकासक आणि सरकारकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने शेलार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. झोपडपट्टीवासियांसाठी उभारलेल्या संक्रमण शिबीराला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याची दुरावस्था झाली असल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने संक्रमण शिबिराची तातडीने दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऍड राजेश दाभोलकर यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com