उद्धव ठाकरेंचं 'भाजप' आणि 'मुख्यमंत्री' पदावरून मोठं विधान..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

"कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही" असं उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या बैठकीत बोलले असल्याचं समजतंय

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 50-50 च्या सूत्रावर बातचीत झाली नसल्याचं म्हणतायत. तर शिवसेनेकडून सत्तेत समसमान वाट्याचा पुनरुच्चार केला जातोय. यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एक विधान केलं गेलंय. शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सणसणीत विधान केलंय. 

"कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घालून आला असल्याचं समजण्याचं कारण नाही" असं उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या बैठकीत बोलले असल्याचं समजतंय. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीसाठी जीबत नरमली नाही हेच संकेत यातून मिळतात. 

शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल सोनिया गांधी यांचा 'मोठा' निर्णय..
 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिवाळीत फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य करताना मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही करार झाला नव्हता आणि मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचे म्हटले होते. हेच विधान उद्धव यांच्या जिव्हारी लागलंय.  

ही आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचितबद्दल भूमिका!
 

आज शिवसेनेचे सर्व आमदार राज्यपालांना भेटणार आहे. या भेटीत काय चर्चा होणार याबद्दलही शिवसेनेकडून कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. अशातच शिवसेनेने आणि भाजपने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

WebTitle : uddhav thackeray on BJP and devendra fadanavis over CM post and government formation

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray on BJP and devendra fadanavis over CM post and government formation