मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सध्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. लॉकडाउन लागू केला नाही तरी कठोर निर्बंध लादण्यात येतील असं सांगितलं जातंय. लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये काही अंशी मतभेद दिसून आले आहेत, पण अखेरचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली असं सरकारमधील मंत्री म्हणताना दिसत आहे. विरोधी पक्षातील नेतेमंडळी मात्र लॉकडाउनला तीव्र विरोध दर्शवत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांशी फोनवरून संपर्क साधल्याची माहिती आहे.

लॉकडाउनला विरोध

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत लॉकडाउन न करण्याचीच भूमिका घेतली आहे. 'लॉकडाउनमुळे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे लॉकडाउन करू नये. आणि लॉकडाउन करायचाच असेल तर त्याआधी गरिबांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा करा', अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली आहे. मनसेदेखील पहिल्यापासून लॉकडाउनच्या विरोधातच आहे. 'लॉकडाउन होता कामा नये. लॉकडाउन झाल्यास छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडतील. लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल', अशी भूमिका मनसेकडून घेण्यात आली आहे. मात्र सध्याचे वातावरण पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दोन महत्त्वाच्या नेत्यांना फोन केला असं सांगण्यात येत आहे.

फडणवीसांशी फोनवरून चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना फोन केला. यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या फोनवरील संभाषणात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी विनंती केली की जर सरकारने लॉकडाउनची घोषणा केली तर विरोधी पक्ष म्हणून त्यांनी निर्णयाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंना फोन

देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत राज यांना मुख्यमंत्र्यांनी कोरोना परिस्थितीबाबतची माहिती दिली आणि सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतल्यास त्याला मनसेने पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com