Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. शरद पवार, मल्लिकाअर्जुन खर्गे, उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal

Uddhav Thackeray :  पाचव्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. महायुतीच्या आरोपांवर मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जोरदार पलटवार केला. भाषणातून हिंदू शब्द वगळला, प्रचारसभेत पाकीस्तानचे झेंडे नाचवले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाषणात मी देशभक्त म्हणालो आणि देशभक्त शब्दावर त्यांचा आक्षेप असेल तर ते हिंदू नाहीत किंवा देशभक्त नाहीत. कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कुणी लावला?, देशभक्त असणं हा काय गुन्हा आहे का?. आमच्यावर जे पाकीस्तानचा झेंडा नाचवल्याचा आरोप करतात ते देशद्रोही आहेत. ते हिंदू नक्की नसतील.

भारतातील सर्व हिंदू आम्ही देशभक्त आहोत. यामध्ये सर्वजण आहेत. मुस्लीम, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत. जी लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी म्हणातात, देशद्रोही म्हणतात. संघाचे कार्यवाहक शेतकऱ्यांच्या आंजोलनातून अराजक येतय मानतात, हे देशभक्त आहेत, असं मला वाटत नाही. माझ्या देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे देशद्रोही आहेत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

पाकिस्तानचा झेंडा त्यांनी पाहिला असेल. नरेंद्र मोदींना नवाज शरिफ यांचा केक आवडला असेल. त्यामुळे त्यांना पाकिस्तान आठवतो, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला. 

Uddhav Thackeray
RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com