girish raut
sakal
- निखिल मेस्त्री
पालघर - पालघरमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाने खांदेपालट करत आपले जिल्हा स्तरावरील पदाधिकारी बदलले आहेत. यापूर्वी डहाणू आणि पालघर विधानसभेची जबाबदारी असलेले जिल्हा प्रमुख अजय ठाकूर यांच्यावर लोकसभा निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा प्रमुख म्हणून यापूर्वीचे सहसंपर्कप्रमुख गिरीश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.