Uddhav Thackeray: "लोकशाहीचे तिन्ही स्तंभ कोसळलेत आता..."; उद्धव ठाकरेंनी मांडली खदखद

महाविकास आघाडीच्या बैठकीत संबोधित करताना उद्धव ठाकरे बोलत होते.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

नवी दिल्ली : महाविकास आघाडीची बैठक आज पार पडली. यावेळी आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. लोकशाहीचे तिन्ही खांब कोसळले असल्याचं सांगताना आता केवळ सुप्रीम कोर्टच आशेचा किरण असल्याचं ते यावेळी म्हणाले. (Uddhav Thackeray in MVA meeting slams on BJP with reference to democracy)

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र हा मोदींमुळं नावारुपाला आलेला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आला आहे. लोकशाहीच्या चार खांबांपैकी तीन खांब कोसळले आहेत. माध्यमांच्या हातात देखील लेखणीच्या ऐवजी आता कमळ आलं आहे. यामध्ये केवळ न्यायव्यवस्था आणि त्यातही सुप्रीम कोर्टच आशेचा किरण शिल्लक आहे. कोर्ट तरी न्यायाची अधोगती होऊ देणार नाही"

हे ही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

"भाजपनं जेव्हा रथयात्रा सुरु केली तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता, त्यावेळी त्यांचे केवळ दोनच खासदार होते. याला चेहरा लालकृष्ण अडवाणी होते. पण जेव्हा भाजपचं सरकार स्थापन होण्याची आशा दिसू लागली तेव्हा त्यांना जयललिता आणि इतरांचा पाठिंबा हवा होता. पण धर्मनिरपेक्षतेसाठी इतरांनी अडवाणींच्या चेहऱ्याला विरोध केला आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान बनले. मग आता हिंदुत्व कोणी सोडलं शिवसेनेनं की भाजपनं?" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com