
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले. ठाकरे नाव हे केवळ एक नाव किंवा ब्रँड नाही, तर ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आणि हिंदू अस्मितेच्या गौरवाचे प्रतीक आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. "ठाकरे हा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण जे पुसायला आले, ते स्वतःच पुसले गेले," असे उद्धव ठाकरे यांनी सांगत राजकीय विरोधकांना टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.