आता उद्धव रोखणार मोदींची बुलेट ट्रेन ? 

अभिजीत सोनावणे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

  • किमान समान कार्यक्रमामुळे बदलणार प्राधान्यक्रम
  • खर्चिक प्रकल्पांपेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भर?

राज्यात महाशिवआघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं कंबर कसलीय.  महाशिवआघाडीची सत्ता महाराष्ट्रात आली तर मात्र भाजपच्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर पाणी फिरवलं जाऊ शकतं अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त क्लीये.   

महाराष्ट्र राज्यात नव्याने राजकीय समिकरणं आखली जातायत. या नव्या सरकारचे प्राधान्यक्रम ठरवले जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला मान्य होईल असा एक किमान समान कार्यक्रम ठरवला जातोय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्राधान्यक्रमात शेतकरी, युवा वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या योजनांवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय सध्या अनावश्यक असणाऱ्या आणि खर्चिक अशा योजनांसाठीचा निधी रोखण्याला या नव्या सरकारचं प्राधान्य असेल. त्यामुळे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, आणि नाणार सारखे फडणवीस सरकारचे महत्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.

यापुर्वीही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा वारंवार केलीय. तर शरद पवारांनीही सध्या ओल्या दुष्काळावर लक्ष केंद्रीत केलंय. काँग्रेसनेही आपल्या योजनांमध्ये सर्वसामान्य माणसाला नेहमी प्राधान्य दिलंय. अशा वेळी लोकानुनयी योजनांसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे.

याशिवाय बुलेट ट्रेन, नाणार आणि समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावर शिवसेनेने प्रकल्प विरोधी भूमिका घेतली होती. ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे महत्वाकांक्षी प्रकल्प थंडबस्त्यात जाण्याची शक्यता आहे.

WebTitle : uddhav thackeray may stop few very important projects started by BJP
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhav thackeray may stop few very important projects started by BJP