
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक नवा अध्याय लिहिला गेला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येत मराठी अस्मितेचा जागर केला आणि सत्ताधारी महायुती सरकारला थेट आव्हान दिलं. वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित विजयी सभेत ठाकरे बंधूंनी एकजुटीचं प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला. ही घटना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.