ठाकरेंना दणका! शिंदे गट दादरमध्येच नवं सेनाभवन उभारणार

मुंबईत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नव्या शाखाही सुरू करण्यात येणार आहेत.
 shiv sena bhavan
shiv sena bhavan sakal

शिंदे आणि ठाकरे वाद आता चांगलाच उफाळून आला असून दोघांच्या चुरशीची लढत सुरू आहे. या लढतीत आता शिंदे गटाने नवा डाव खेळला आहे. ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी आता शिंदे गट मुंबईत नवं सेना भवन उभारणार आहे. दादरमध्येच हे नवं सेना भवन उभारलं जाणार असल्याची माहिती सदा सरवणकर यांनी दिली आहे.

 shiv sena bhavan
"...मग मी शिवसेना माझीच म्हणायला पाहिजे"; उदयनराजेंचा संताप

सातत्याने शिंदे गट ठाकरेंना दणका देत असल्याचं दिसून येत आहे. याबद्दल शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी माहिती दिली आहे. आज एक आाभास निर्माण केला जातोय की मुंबईवर ठाकरे गटाचं राज्य आहे. मुंबईतल्या जनतेचं, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामं झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही.

 shiv sena bhavan
खातेवाटप कधी होणार? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं...

सरवणकर पुढे म्हणाले की, आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जातील, शाखाप्रमुखांची घोषणा होईल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम जोरदार सुरू होईल. शिंदे साहेबांच्या कामाची गती पाहता त्यांना चांगल्या कार्यालयाची गरज आहे. त्यामुळे दादरमध्येच त्यांचं एक मुख्य कार्यालय असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली इतर शाखा काम करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com