

Uddhav Thackeray
esakal
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेनाभवनात पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, निवडणूक आयोग संविधानविरोधी वागतो आहे. निवडणूक आयुक्तांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. बोटावरील शाई पुसण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग हे नाकारत असतील, तर यात मिलीभगत आहे. महायुतीकडे कोणतेही कर्तृत्व नाही, म्हणून निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आटापीटा सुरू आहे.