येणार तर युतीचेच सरकार येणार : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

उद्धव ठाकरे म्हणाले, की पुढील सरकार युतीचे येणार आणि यावर सगळ्यात जास्त टाळ्या देवेंद्र फडणवीस यांनी वाजविल्या. राज्याच्या विकासासाठी पुन्ही युतीचे सरकार येणे गरजेचे आहे.

मुंबई : आम्हाला सत्तेची हाव नाही, पण पुढील सरकार हे युतीचेच सरकार येणार हे निश्चित आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत मेट्रो 10,11 आणि 12 या मार्गांसह मेट्रो भवनचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. वांद्रे कुर्ला संकुलात हा सोहळा संपन्न झाला. गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोज) मेट्रो 10, कल्याण ते तळोजा मेट्रो 12 महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी हे मार्ग उपयोगी ठरणार आहे. याशिवाय वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मेट्रो मार्ग 11 वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमात बोलतान उद्धव ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की पुढील सरकार युतीचे येणार आणि यावर सगळ्यात जास्त टाळ्या देवेंद्र फडणवीस यांनी वाजविल्या. राज्याच्या विकासासाठी पुन्ही युतीचे सरकार येणे गरजेचे आहे. मित्रपक्षांचेच सरकार यापुढे येईल. मोदींजीचा मला अभिमान आहे. मोदींनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवून मोठा निर्णय घेतला. याचप्रमाणे भविष्यात अयोध्येत राम मंदिर आणि समान नागरि कायदा असे मोठे निर्णयही घेतले जातील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray speaks at Mumbai Metro inauguration