esakal | चंद्रकांतदादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत : उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांतदादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत : उद्धव ठाकरे

चंद्रकांतदादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत : उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबत एकत्रित जाण्यावर आपली बाजू मांडली. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यानी पत्रकार परिषद घेत काही गोष्टींवर शिवसेनेला देखील स्पष्टता हवी असल्याचं मत व्यक्त केलंय. अशातच उद्धव ठाकरे यानी स्वतः शिवसेनेकडून कालच समर्थन मागितलं गेलं याबाबत स्पष्टपणे वाच्यता केली. 

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केलीये. चंद्रकांतदादांच्या शुभेच्छांमुळेच आम्ही आघाडीसोबत गेलो अशी उपरोधिक टीका उद्धव ठाकरे यानी केली. गिरीश बापट यांनी राष्ट्रपती राजवट लागू होणं योग्य असल्याच वक्तव्य केलं. अशात उद्धव ठाकरे यानी त्यावरही उपरोधिक टीका केलीये. गिरीश बापट यांनी त्यांची ब्रह्मवाक्य लिहून ठेवावी असं उद्धव ठाकरे यानी म्हटलंय.   

अरविंद सावंत यांनी सत्तेला लाथाडून केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्याचा मला गर्व आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.   

महाराष्ट्राला या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले याआधी लाभाले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Webtitle : uddhav thackeray taunts bjp and bjp leaders in his press conference