उद्धव ठाकरे ठाण्यात, थेट एकनाथ शिंदेंना आव्हान; जोरदार शक्तीप्रदर्शन: Uddhav Thackeray-Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Uddhav Thackeray-Eknath Shinde : उद्धव ठाकरे ठाण्यात, थेट एकनाथ शिंदेंना आव्हान; जोरदार शक्तीप्रदर्शन

ठाणे : शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांमध्ये कायमच संघर्ष पहायला मिळाला आहे. आजही हा संघर्ष पहायला मिळाला, कारण उद्धव ठाकरे हे ठाण्यात दाखल झाले आहेत. या ठिकाणी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, त्यामुळं उद्धव ठाकरेंनी ठाण्यात जाऊन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे. (Uddhav Thackeray visited Thane directly challenged to CM Eknath Shinde)

उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल्यानंतर त्यांनी टेंभी नाक्यावर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते केदार दिघे आणि राजन विचारे हे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच ठाण्याला भेट दिली आहे. त्यामुळं सकाळपासूनच त्यांच्या या दौऱ्याची मोठी चर्चा होती.

टेंभी नाक्याला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमला जाण्याचं मात्र टाळलं. शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या विनंतीवरुन उद्धव ठाकरेंनी इथं जाणं टाळलं. दरम्यान, जवळील जैन मंदिरालाही देखील त्यांनी भेट दिली.