

मुंबई : ‘बांगलादेशात हिंदूंची मंदिरे जाळली जाताहेत, आपले ‘विश्वगुरू’ (पंतप्रधान मोदी) हे अत्याचार नुसते पाहत का बसले आहेत? संसदेत महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन नको त्या विषयावर चर्चा भरकटवली जात आहे. हिंदू त्यांना केवळ मते वाटतात, ती मते नाहीत, हिंदूंना भावना आहेत. यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे का,’’ असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.