ठाकरे साहेब, माफ करा; यावेळी मत मनसेला...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

माननीय उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र!! माफ करा. यावेळी भाजपला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला!!! असे पोस्टर्स घाटकोपरमध्ये झळकले असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.

मुंबईः माननीय उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र!! माफ करा. यावेळी भाजपला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला!!! असे पोस्टर्स घाटकोपरमध्ये झळकले असून, सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली असली तरी काही ठिकाणी शिवसैनिक नाराज असल्याचे दिसून येत आहे. घाटकोपर पश्चिम येथे स्थानिक शिवसैनिकांनी युतीचे उमेदवार राम कदम यांच्याविषयी पोस्टर्समधून नाराजी व्यक्त केली आहे. घाटकोपरमध्ये शिवसेनेचा उमेदवार द्यावा, अशी मागणी शिवसैनिकांची होती. मात्र, युती झाल्याने हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आला त्यानंतर या मतदारसंघात राम कदम यांना पक्षाने पुन्हा संधी दिली.

घाटकोपर येथील कट्टर शिवसैनिकाने म्हटले आहे की, 'माननीय उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र!! किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला सेना भाजपची युतीची उमेदवारी मिळू दिली नाही तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला आणि महिलांचा अपमान करणारा राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नका अशी आपली ठाम भूमिका होती. पण आज भाजपने युतीची घाटकोपरची त्याला उमेदवारी दिली. साहेब. माफ करा. यावेळी भाजपला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला.'

दरम्यान, दहिहंडीच्या कार्यक्रमात आमदार राम कदम यांनी मुलींबाबत वक्तव्य करताना म्हणाले होते की, 'मला लोकं म्हणतात, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती नाही म्हणतेय, मला मदत करा. चुकीचं आहे. शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई-वडिल जर म्हणाले की साहेब आम्हाला ही मुलगी पसंत आहे, तर आम्ही तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uddhavsaheb sorry no vote bjp this time mns shivsena posters viral ghatkopar