esakal | उल्हासनगर: मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या इशिता गौतमचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

उल्हासनगर: मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या इशिता गौतमचा मृत्यू

sakal_logo
By
दिनेश गोगी

उल्हासनगर : चार दिवसांपूर्वी मोटारसायकल अपघातात (Bike Accident) गंभीर जखमी झालेल्या 4 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूची झुंज अखेर संपली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi police) मोटारसायकल चालकाला (Culprit arrested) अटक केली आहे. 10 तारखेच्या रात्री सुभाष टेकडी गुरुद्वारा जवळ खेळत असलेल्या इशिता अशोक गौतम (Ishita Gautam death), या 4 वर्षीय चिमुकलीला भरधाव मोटरसायकलने उडवले होते. त्यात इशिता गंभीर जखमी झाली. इशिताला मुंबईतील केईएम रुग्णालयात (kem hospital) दाखल करण्यात आले होते.चार दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या इशिताची प्राणज्योत अखेर मावळली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: कोरोना मृत्यूंमध्ये दहा रूग्णांमागे 3 ते 4 रूग्ण मधुमेहग्रस्त

आरोपीला अटक करेपर्यंत निशिताचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा शिवसेना नगरसेविका ज्योती माने, समाजसेविका प्रा.अस्मिता अभ्यंकर,नातलगांनी घेतला. विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.आरोपीला अटक करण्यात आल्याचे सांगितल्यावर इशिताचा पार्थिव ताब्यात घेण्यात आल्यावर शोककळेच्या वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष टेकडी ते गुरुद्वारा रोड हा पूर्वी सुरक्षित होता.या परिसरात सुशिक्षित आणि शासकीय नोकरदार,डॉक्टर्स,उच्चशिक्षित नागरिक राहतात.मात्र आता रात्री 9 ते 10 वाजल्यानंतर याठिकाणी नशेडी,गर्दुल्यांचा वावर असून वेगाने मोटरसायकली चालवल्या जातात.त्यामुळे हा परिसर असुरक्षित झाला असून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास सातत्याने गस्त वाढवून नागरिकांची सुरक्षा करावी अशी मागणी नगरसेविका ज्योती माने,समाजसेविका प्रा.अस्मिता अभ्यंकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्याकडे केली आहे.

loading image
go to top