
उल्हासनगर - एमएमआरडीएच्या मार्फत उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीन शहरांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम बदलापुरातील वालवली येथे सुरू आहे. या प्रकल्पाची उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी पाहणी करून आढावा घेतला असून संबंधितांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.