Ulhasnagar Corona: अनाथालयातील 16 विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाथ विद्यार्थ्या

उल्हासनगर : अनाथालयातील 16 विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात

उल्हासनगर : सर्टीफाईड  शासकीय अनाथालयातील 16 विद्यार्थी कोविडच्या विळख्यात सापडले असून त्यांना तहसील येथील पालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली. (Ulhasnagar Student Corona Infection)

सर्टीफाईड शासकीय अनाथ विद्यार्थ्यांची शाळा ही तक्षशिला शाळेच्या थोड्याश्या अंतरावर आहे. अनाथालयात 33 विद्यार्थी राहत असून काही दिवसांपासून त्यांना सर्दी खोकल्याच्या त्रासाने त्रस्त केले होते. शेवटी 33 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असताना त्यातील 16 विद्यार्थी हे कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना पालिकेच्या तहसील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी सांगितले.

Web Title: Ulhasnagar Corona Student Infection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsCorona updates
go to top