उल्हासनगर : आठवडाभरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर दोन कारवाई केल्याने उल्हासनगर क्राईम ब्रँच फ्रंटफुटवर आली आहे..सर्वप्रथम अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्राय-डे च्या दिवशीच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका तरुणाला क्राईम ब्रॅंचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या टीमने अटक करून त्याच्याकडून जवळपास 40 रुपयांचा साठा जप्त केला होता..4 फेब्रुवारी रोजी क्राईम ब्रॅंचचे पोलीस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती की,बदलापूर कर्जत रोड वरील खरवई गावातील मृणाल हॉटेल येथे एक इसम अवैध रित्या देशी विदेशी दारूच्या बाटल्याची विक्री करीत आहे..त्यानुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सहायक पोलीस उपनिरिक्षक बबन बांडे व हेड कॉन्स्टेबल सावंत,गावडे,जाधव,शेरमाळे,थोरवे,उगले यांनी खरवई गावातील मृणाल हॉटेलमध्ये छापा टाकला.आणि संजय अशोक कोंडू याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 27 हजार रुपयांचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला. .सविस्तर पंचनामा केल्यावर आरोपीला पुढील कारवाईसाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या सुपूर्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.