
उल्हासनगर : गरोदर महिलेच्या ऑपरेशन साठी बोलावूनही भुलतज्ञ डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालक हे ऑन-ड्युटी झोपा काढत असल्याचा प्रकार उल्हासनगरातील शासकीय महिला प्रसूतीगृह रुग्णालयात चव्हाट्यावर आला आहे.या प्रकरणी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.शशिकांत डोडे यांनी भुलतज्ञ डॉक्टर आणि दोन रुग्णवाहिका चालक अशा तिघांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.