
Ulhasnagar Firing - उल्हासनगर मधील भाजपाचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्यावर कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला आहे.दरम्यान प्रत्युत्तर दाखल त्यांच्या अंगरक्षकांनी देखील गोळीबार केली.
हा सर्व प्रकार हिललाईन पोलिस हद्दीत घडला असून चार अनोळखी लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध सुरु केला आहे.दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे .
उल्हासनगर कॅम्प नंबर ५ च्या प्रभाराम मंदिर शेजारी रोहरा यांचे कार्यालय आहे.संध्याकाळच्या सुमारास चार तरुण रोहरा यांच्या कार्यालयाजवळ आले,त्यांच्याकडे हत्यारं असल्याने रोहरा यांच्या अंगरक्षकांनी त्याना कार्यालयात जाण्या पासून रोखले.
मात्र ते पळून जात असताना एका जणाला त्यांनी पकडून मारहाण करायला सुरुवात केली.यावेळी या आज्ञातांनी समोरून गोळीबार केला, त्यामुळे रोहरा यांच्या अंगरक्षकांनी देखील त्यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसून याप्रकरणी उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीचा शोध सुरु केला आहे.दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की नरेश साजनदास रोहरा यांचे शॉप नं.०१, महादेव केबल नेट, प्रभाराम मंदिरा समोरील गल्लीत, लालचक्की रोड, उल्हासनगर-५ या ठिकाणच्या ऑफिसवर ०४ अनोळखी इसम यांनी संगनमत करून त्यापैकी एक इसम हा नरेश रोहेरा यांचेऑफिसमध्ये येवुन सुरक्षा रक्षक खान यास म्हणाला की, "नरेश कुठे आहे? मला त्यांचे सोबत बोलायचे आहे.
त्यावेळी त्याचे तोंडाला दारू पिल्याचा वास येत असल्याने त्यास खान याने ऑफिसचे बाहेर काढले.त्यामुळे आरोपी यांनी सुरक्षा रक्षक आणि सहकारी यांनच्यात धक्काबुक्की झाली.आरोपीने पिस्टल रोखून नवीन का पीछा छोड़ दे, नहीं तो नरेश को गो मार दूगा.अशी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन ते सदर ठिकाणावरून पळुन जात असतांना गावठी कट्टा हातात असलेल्या इसमाने फायरींग केली.याप्रकारणी ०४ अनोळखी इसमावर २५३ / २०२३ भा.द.वी कमल
४५२, ५०६ (२), ३४, अधिनियम२७, कायदा ३७(१),
प्रमाणे ४४०,३२३, शस्त्र ३, महा.पो.कलम १३५ प्रमाणे गुन्हा दखाल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.