
उल्हासनगर : विविध लीग क्लब,राष्ट्रीय स्पर्धेत गोलकीपर म्हणून खेळणारी उल्हासनगरातील कन्या पायल रमेश बसुदे हिने तिच्या खेळाच्या बळावर मोठी झेप घेतली आहे.तिने भारतीय संघाकडून दुबई मध्ये झालेल्या इंटरनॅशनल फुटबॉल स्पर्धेत गोलकीपरची भूमिका निभावून शहराचे नावलौकिक केले आहे.पायल ही भारतीय संघाकडून गोलकीपर म्हणून खेळणारी महाराष्ट्रातील पहिलीच मुलगी आहे.