उल्हासनगर - जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालय हे गेल्या 5 तासांपासून अंधारात आहे. एकीकडे महावितरणने घेतलेले शट डाऊन आणि त्यात रुग्णालयामधील जनरेटरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रुग्णांवर मेणबत्तीवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे.