
Ulhasnagar News: महात्मा गांधी यांच्या 30 जानेवारी या पुण्यतिथी च्या दिवशी संपूर्ण देशभरात दारूची दुकाने बंद ठेवून ड्राय-डे पाळला जात असतानाच,नेमक्या याच दिवशी अंबरनाथ मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करण्यात येत असल्याचा पर्दाफाश उल्हासनगर क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईत केला आहे.
सर्वत्र वाईन शॉप,देशी दारूची दुकाने बंद असताना अंबरनाथ गावातील दुर्गापाडा परिसरात एक इसम अवैधरित्या देशी-विदेशी दारूच्या क्वार्टरची विक्री करत असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रॅंचचे पोलीस कॉन्स्टेबल रामदास उगले यांना मिळाली होती.