
उल्हासनगर : महानगरपालिकेच्या अकाऊंट अँड फायनान्स डिपार्टमेंट अर्थात लेखा विभागाला त्यांनी केलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या बदलावामूळे प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवसांपूर्वीच ISO प्रमाणपत्र मिळाले आहे.त्यामूळे उल्हासनगर महानगरपालिकेची मान उंचावली असून शहराला लाभलेल्या पहिल्याच आयएएस महिला आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी लेखाविभागाकडून प्रेरणा घेण्याच्या सुचना सर्व विभागांना दिल्या आहेत.